पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बाम्हणगाव येथील शेतकरी ठार
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक.०५ जून २०२० चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर व कोअर झोन लागत असलेल्या सातारा शेत शिवारातील जंगलामध्ये शेतीला लागणाऱ्या कुंपण साठी काट्या तोडण्या करिता जंगलात गेले असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सायंकाळी ०५.३० वाजता अचानक पने केलेल्या हल्ल्यात राज्यपाल दयाराम नागोसे वय ४० वर्षे रा.बाम्हणगांव येथील शेतकरी यास ठार केले. यापूर्वी याच परिसरातील हि पाचवी घटना आहे.गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात.
या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला व सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले. त्यामुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशतीमध्ये वावरताना दिसत आहे. यावेळी शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मोका चौकशी करून पंचनामा केला.आणि शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मृतदेह नेण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!