मुलचा 'तो' परिसर सील
मूल (प्रतिनिधी)
मूल शहरात आज क़रोणाचा पहिला रूग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली. प्रशासनाने सतर्कता दाखवीत हा युवक राहत असलेला परिसर सील केलेला आहे. या परिसरात जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट लावून बंद केले. महसूल प्रशासन, नगर परिषद प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने या युवकांचे घरी जाऊन, त्याला पुढील कार्यवाही करिता चंद्रपूरला पाठविले आहे.
त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. गृहअलगीकरणात तो तरुण असला तरीही त्यांचे कुटुंबीय मात्र इतर लोकांच्या संपर्कात आल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे.
....
मुल वासियांना पब्लिक पंचनामा चे आवाहन
....
घरीच रहा, कोरोना टाळा..
....




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!