जबरदस्तीने वसुली बंद करा आप'ची मागणी
जबरदस्तीने वसुली बंद करा
फायनान्स कंपनीला आप ची तंबी
चंद्रपूर (प्रतिनिधी)
दिनांक 4/ 6/ 2020 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपूर कडे तक्रार आली होती की स्पंदनं स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेड कंपनी गरीब लोकांना 24 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करते व व ही कंपनी गटाचे मार्फत कर्जाचे वाटप करते. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट गरीब लोकांना धमकावून जोर जबरदस्ती करून पैसे वसूल करीत आहे अशी तक्रार आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाली लाॅकडाऊन असल्यामुळे गरीब लोकांचा काम धंदा बंद आहे रोजगार गेला त्यामुळे ते पैसे भरू शकत नाही या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन या फायनान्स कंपनीचे ऑफिस वर जाऊन तात्काळ धडक दिली जबरदस्तीने वसुली करू नका अशी तंबी दिली फायनान्स कंपनीने सुद्धा आम आदमी पार्टीची मागणी मान्य करून यापुढे कुठलाही रिकवरी एजंट बळजबरीने वसुली करणार नाही याची हमी दिली यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे कोषाध्यक्ष भीवराज सोनी संघटनमंत्री परमजीत सिंह झगडे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे इत्यादी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!