महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने माल वाहतूक सेवा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू
कोरोना ची भूमिका लक्षात घेता कमी दराने बस उपलब्ध
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.२२ मार्च २०२० पासून कोरोना कोविड - १९ या संसर्गजन्य रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर पसरू नये म्हणून संपूर्ण भारतात सरकार ने लॉक डाऊन ची भूमिका आखली.कोरोना या रोगामुळे मोठ्या प्रमाणात जनता मृत्युमुखी पडली असून अनेकांना या रोगाची लागण व लक्षणे दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सोशल डिस्टन्स राखून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेस सुविधा सुरू केली त्यात प्रत्येक सिट वर १ प्रवासी बसेल आणि लहान मुलांना तसेच व वयोवृद्ध गटातील व्यक्तींना प्रवासास बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे.हे लक्षात घेता महामंडळाला नफा व्हावा या करीता माल वाहतूक सेवा कमी दरात सुरू करण्यात आली आहे.या माल वाहतूक बसेस ची सुविधा सर्वांना उपलब्ध होईल या करीता प्रत्येक जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील आगार प्रमुख व चौकशी कक्षेत माहिती दिली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!