पोंभूर्णात युवकाची आत्महत्या



पोंभूर्णा (प्रतिनिधी)
पोंभूर्णा शहरातील आस्तिक चौक येथील सुरज रविंद्र मोहुर्ले वय (१८) वर्ष या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जून ला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वडिल रविंद्र मोहुर्ले हे हमालीचे काम करतात तर मृतक सुरज हा रोजंदारीचे काय करायचं. सोमवारी काम नसल्याने सुरज व वडिल दोघेही घरिच होते. जेवण झाल्यावर वडिल शेजारच्या घरी टिव्ही पाहण्यासाठी गेला होता तर लहान बहिण शेजारच्या घरी बसली होती. घरात कुणी नसल्याचे पाहून सुरज ने घराच्या फाट्याला नायलॉनच्या दोरिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली . त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!