पवनपार परीसरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
पवनपार परीसरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
शेळ्यासमवेत तिन व्यक्तींना केले घायल
एक गंभीर जखमी
जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही):-
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार व पवना या गावात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली असुन शेळ्यासमवेत तीन नागरीकांना घायल केले तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला चंद्रपुरच्या दवाखान्यात भरती केल्याचे वृत आहे.
ग्रामिण भागात दिवसेंदिवस कुत्र्यांची पैदास वाढत आहे. मोजकेच मालकीचे कुत्रे असतात.बाकी कुत्रे बिनमालकीचे लावारीस असतात. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्रामिण भागात गलोगल्ली ,रस्त्यावर चौकाचौकात कुत्रे पाहायला मिळत आहेत.
कोनता कुत्रा कसा हे सांगता येत नाही. पिसाळलेल्या कुत्र्यांची लक्षने ही माहीत नसतात. त्यामुळे व्यक्ती बेसावध फिरतो.अशातच कुत्रे आक्रमन करतात व चावा घेतात .
आज पिसाळलेल्या कुत्र्याने पवनपार येथील तिन व्यक्तीवर आक्रमन केले.त्यात एक महिला गंभीर जखमी झाली . दोन किरकोळ जखमींना उपचार करण्यात आले तर एक महिलेला उपचारा करीता पाठवन्यात आले आहे.
पिसाळलेला कुत्रा गायी,बैल शेळ्यावरही जावुन आक्रमन करीत असल्याने येथील नागरीक भयभित झाले आहे. त्यामुळे कुत्रा दिसताच नागरीक लाठी काठी घेवुन बाहेर पडतात .मागील महिन्यातही कुत्र्याने चावा घेतला होता.आज पवना व पवनपार येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली असुन अनेकांना जखमी केल्याने संबंधीत विभागाने यांचा प्रतिबंध करण्यात यावा अशी मागनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!