शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खाजगी कंपण्या व दुकाण दारावर कारवाई करा - ओंकार कोवे
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२२/०६/२०२० ला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खासगी कंपण्या व दुकाण दारावर कारवाई करण्यात यावी.कृषी अधिकारी डी.ए. तिखे यांना निवेदन देण्यात आले.
आपल्या महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भात विविध पिकांच्या खासगी कंपनी कडून बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असे विदर्भातील अनेक जिल्ह्यात दिसून आले आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश बंद असताना शेतकरी राजा हा दिवसरात्र आपल्या शेतात मेहनत करत आहे. देशाचा आर्थिक कणा सक्षम राखण्यासाठी शेतकरी बाप जर दिवसरात्र राबताना त्याची फसवणूक बियाने कंपन्या करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे म्हणून कृषी पदवीधर संघटनेचे चिमूर तालुका संघटक ओंकार कोवे यांनी तालुक कृषी अधिकारी डी. ए. तिखे यांना निवेदन दिले.व सदर निवेदनात बोगस बियाणे प्रसारित करणाऱ्या खासगी कंपन्या व दुकाण दारावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदन देते वेळेस कृषी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत तळवेकर उपाध्यक्ष चिन्मय तळवेकर कोषाध्यक्ष श्रीनंदन राचालवर यांच्या मार्गदर्शनात तालुका संघटक ओंकार कोवे व मित्र परिवार प्रशिक धनविजय,अकीब शेख,अखिलेश नवनागे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!