ग्रामिन भुमिहीनांच्या सुशिक्षित मुलावर बेरोजगारीचे संकट

ग्रामिण भुमिहीनांच्या सुशिक्षित मुलावर बेरोजगारीचे संकट - भविष्याची चिंता


जितेंद्र पेंदाम ( ता.प्रतिनिधी सिंदेवाही)
ग्रामिण भागातील भुमिहीनांच्या सुशिक्षित मुलांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असुन भविष्याची चिंता सतावत आहे.
कोरोनाच्या थैमानापुर्वी ग्रामिण भागातील मजुर व सुशिक्षित बेरोजगार मुलं विविध जिल्ह्यात ,विविध राज्यात,विविध शहरात मिळेल ते काम करण्या करीता जात होते.
कुणी नागपुरच्या हॉटेलात ,कुणी फरणीचरच्या दुकानात ,कुणी वेल्डींगच्या वर्कशापमध्ये,कुणी वाईनशाप मध्ये ,कुणी फुटपाथवर विविध कामे करायला शहरात गेले होते.
कुणी मुंबइसारख्या शहरात ही काम करायला गेले होते. तर कुणी हैद्राबाद सारख्या शहरात काम करायला गेले होते. यासारखे विविध शहरात ग्रामिण भागातील सुशिक्षित बेरोजगार जमेल ते कामे करायला गेले होते.
ज्या सुशिक्षित मुलांना गावी जमिन जुमला नाही त्यांचे तर हे शहर माहेर घर बनले होते. कित्येक मुलांनी आपल्या आइ वडीलाना पैसे पाठवायचे. त्यावर त्यांचे कुटूंब चालत होते. काही मुलेतर आपल्या बहीणीचे लग्ण सुद्धा आपल्याच कमाइने केले.
हे सर्व करीत असतांना भविष्याची स्वप्न पाहत होते.
आपली जिंदगी चागल्यां तर्हेने बसवावं . या स्वप्नात होते. परंतु अचानक कोरोना संकट आलं आणि सर्व धुळीस मिळालं .
कोरोना सारख्या महामारीत संम्पुर्ण मोठमोठाले शहर वाहुन गेले आहेत. आपलाच जीव वाचवण्याची परीस्थिती निर्माण झाली. आपला जीव वाचवन्याकरीता जो तो धडपडु लागल्याचे चित्र निर्माण झाले. अन शेवटी गावाकडे येणे महत्वाचे झाले.
गावाकडे येताना सुख वाटत असले तरी ते सुख जास्त काळ टिकनार नाही आहे.
ग्रामिण भागात उद्ध्येग नाही. काम ही नाही. नुसता रिकाम टेकडा राहावं लागते.
जे शेतकर्यांचे मुलं आहेत ते शेतावर जावुन कामे तरी करतील. पण ज्यांना शेती नाही ते काय करावं असा प्रश्न पडलेला आहे.
उद्योग करावं तर पैसा पाहीजे . जवळ पैसा ही नाही. उद्योग करायला तसं वातावरन नाही. या विवंचनेत ग्रामिण भागातील सुशिक्षित बेरोजगार आहेत.
भुमिहीनांच्या मुलावर तर भयानक संकट ओढवलं आहे.
कोरोना विषानुच्या महामारी वर सर्व राज्य, सर्व शहर मात करेल यात शंका नाही. परंतु परत आलेले ग्रामिण भागातील बेरोजगार परत जायला उत्सुक नाही आहेत.
आता पुन्हा त्यांना भिती सतावत असल्याचे चित्र ग्रामिण भागात पाहायला मिळत आहे.
उद्योग ,कंम्पनी मध्ये काम करनारे कसे तरी जातीलही मात्र जे फुटपाथवर काम करून पैसा कमवनारे होते त्यांच्यावर मात्र आर्थिक संकट कोसळलं आहे. जिवनच ओझं झालं आहे अशी प्रतिक्रिया ग्रामिण भागातील भुमिहीनांच्या सुशिक्षित मुलांची आहे.
यावर उपाय योजना होने महत्वाचे आहे अन्यथा बेरोजगार वाढल्यास दोन वेळच्या पोट भरण्याकरीता दारोदारी भटकण्याची वेळ यायला उशिर लागणार नाही हे विदारक चित्र ग्रामिण भागात निर्माण झालेलं आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!