महा.रा.म. पत्रकार संघातर्फे यतीश देशमुख यांना भावपूर्ण निरोप
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा - वरोरा तर्फे परिवीक्षाधीन सहा.पोलीस अधिक्षक यतीश देशमुख (भापोसे), पोलीस निरीक्षक वरोरा यांना पोलीस स्टेशन वरोरा कार्यालय परिसरात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
तीन महिन्यांसाठी वरोरा पोलीस स्टेशन ची जबाबदारी यतीश देशमुख यांना देण्यात आली होती. देशात, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मिळालेली जबाबदारी यतीश देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पूर्ण कर्तव्यनिष्ठेने यशस्वीपणे पार पाडली. वरोरा येथील कार्यकाळ संपल्यावर त्यांना महा.रा.मराठी पत्रकार संघ वरोरा शाखेतर्फे निरोप देण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव माणूसमारे, कार्याध्यक्ष बाळू भोयर, सचिव प्रवीण गंधारे, यांचे हस्ते देशमुख याचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी श्याम ठेंगडी, राजेंद्र मर्दाने, जयंत आंबेकर, शाहीद अख्तर, डॉ. प्रवीण मुधोळकर, सतीश चव्हाण, सादीक थैम, प्रदीप कोहपरे, हरीश केशवाणी, आलेख रट्टे, खेमचंद नेरकर, प्रतीक माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!