बैलाची जोडी उमा नदीमध्ये धूत असतांना २० वर्षीय मुलाचे बुडून मृत्यू



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१२/०५/२०२० ला चिमूर येथील शारदा अंबिका पॉवर प्लँट च्या बाजूच्या उमा नदी मध्ये बैलाची जोडी तिघे जण धूत असतांना आकाश राजू गौरकर वय २० वर्षीय रा.आझाद वार्ड प्रभाग क्रमांक.१२ चिमूर येथील मुलगा डूबून मरण पावला.
हि घटना सायंकाळी ०५:३० वाजता घडली असून नेहमी बैल त्याच ठिकाणी धुण्यासाठी नेत असायचे परंतु " काळ आला आणि घेऊन गेला " 
या मनीप्रमाणे हि घटना घडली असून चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांच्या पथकासह या घटनास्थळी दाखल झाले.

व मासेमारी करणारे ढिवर समाजाचे काही मुले उमा नदी मध्ये जाऊन १ तास शोध घेत आकाश राजु गौरकर या मुलाला बाहेर काढण्यात आले.यावेळी उप जिल्हा रुग्णालय चिमूर चे डॉ.अश्विन अगडे घटनास्थळी माहिती मिळताच दाखल झाले व गौरकर या मुलाला बघून मृत घोषित केले. नंतर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे शव विच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. व या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!