तेंदुपत्तामुळे ग्रामिणांना मिळाला रोजगार

तेंदुपता मुळे शेकडो ग्रामिणांना मिळाला हंगामी रोजगार


जितेंद्र पेंदाम (ता.प्रतीनिधी सिंदेवाही ग्रा):-ग्रामिण भागात रोजगार मिळत नसतो.त्यामुळे ग्रामिण भागातील मजुर बाहेर गावी रोजगार मिळावा म्हनुन जात असतात. परंतु यावर्षी कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने लाकडाउन असल्याने अनेक मजुर तेंदुपता सिझनवर गेले नाहीत.
गावातच कसेबसे काम करावे या हेतुने गावातच राहीले.
तेंदुपता सिझन हा ग्रामिण भागातील मजुरांचा आवडीचा रोजगार .या सिझनवर काहीक मजुरांचे कुटूंब चालते.नगदी व्यवसाय म्हनुन याकडे पाहील्या जाते.
यावर्षी शंभर पुड्यावर २२० ₹ भाव असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मजुर ही याकडे वळला आहे.
हाताला काम नाही. तसं तेंदुपता सिझन जास्त काळ चालत नसला तरी ग्रामिण भागासाठी फार महत्वाचा आहे.
जंगलामध्ये जावुन तेंदुपता गोळा करने हे अवघड व जिकिरीचे आहे. जिवावर बेतुन तेंदुपता गोळा करावं लागते.
असं असलं तरी ग्रामिण भागात तेंदुपता मुळे रोजगार मिळाला. त्यामुळे गरीब कुटूंबांना थोडासा आधार मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!