एफईएस गर्ल्स कॉलेजच्या विदयार्थीनीने केली कोरोणाची जनजागृती

एफईएस गर्ल्स कॉलेजच्या विदयार्थीनीने केली कोरोणाची जनजागृती



चंद्रपूर  (कुमूद भोयर)
चंद्रपूर येथील नामांकीत एफईएस गर्ल्स कॉलेजच्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या विदयार्थीनीने कोरोणाच्या महामारीत जनजागृती करीत नवा आदर्श निर्माण केला.



लॉकडाउनच्या काळात कॉलेज बंद असल्यांने, एफईएस गर्ल्स महाविदयालयाचे प्राचार्य डा. सरोज झंझाड यांचे मार्गदर्शनात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र  बारसागडे सर यांनी सर्व विदयार्थीनीने घरी प्रत्येकी 10—10 मास्क बनवून गरजूना दयावे असे आवाहन केले होते. यासाठी  रासेयोचे प्रतिनिधी पुजा पवार, सांस्कृतीक विभाग प्रमुख कुमूदीनी भोयर, यांचे माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली. त्यांचे आवाहनाला प्रतिसाद देत विदयार्थीनीने 10 पेक्षाही अधिक मास्क तयार करून, ते गरजूना मोफत वाटप केले.  मास्क सोबतच कोरोणाची लागण होवू नये यासाठी काय काय उपाययोजना करायची, कोणती काळजी घ्यायची याचीही माहीती या स्वयंसेवकांनी आपल्या परिसरातील नागरीकांना दिली.



केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तयार केलेला आरोग्य सेतू हा मोबाईल अॅप सर्व स्वयंसेवकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करीत, या अॅपचे महत्व, त्याचा फायदाही नागरीकांना सांगत जनजागृती केली.  हा अॅप डाउनलोड करण्यासाठी या स्वयंसेवकांनी प्रोत्साहनही दिले. यासाठी कु. येवन नेवला, वृक्षाली मासरकर, माधुरी निंदेकर, तृष्णा पथाडे, पुजा धोटेकर, संस्कृती गोहणे, हिना शेख यांनी प्रयत्न केले.
एफईएस गर्ल्स कॉलेजच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!