चिमूर तालुक्यातील मौजा पारडपार येथील,"नितीन शेंडे करतो,विना परवानगी सरकारी जागेवर बिनधास्त मजूरांद्वारे विटाभट्ट्यांचे काम



सरकारी जागा वनविभागाची की महसुल विभागाची ?


विटाभट्टीसाठी खोटा ७/१२,केला,चिमूर तहसील कार्यालयात दाखल

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमुर तालुक्यातील मौजा पारडपार येथे नितीन बाळकृष्ण शेंडे राहतो आहे.हा तरुण मागील ५ वर्षांपासून सरकारी जागेवर,मजूरांद्वारे विटाभट्यांचे काम करतो आहे.या वर्षी सुध्दा नेरी येथील मजूराद्वारे त्याचे विटा तयार करण्याचे काम आजही सुरू आहे.
      नितीन शेंडे हा मजूरा द्वारा,बेकायदेशीर व बेजबाबदारपणे सरकारी जागेवर विटा तयार करण्याचे काम करीत असताना,या व्यक्तीला अभय कोणाचे आहे?महशुल विभागाचे की वनविभागाचे?,हा मुद्दा सध्या वनविभागाच्या व महशुल विभागाच्या अक्कलेचे दिवाळे काढणारा दिसतो आहे.
      सरकारी जागेवर नितीन शेंडे हा बिनधास्त लाखोंच्या घरात कच्या विटा तयार करतो व कच्या विटा मालाला पकवून,पक्या विटा विकतो आहे.असे असताना,नितीन शेंडे यांच्या कडे महशुल विभागाद्वारे दुर्लक्ष का म्हणून केल्या जातो आहे?हेच कळायला मार्ग नाही.
     मागील दोन वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात विटाभट्ट्यांचे परवाने देणे बंद आहे.मात्र,चिमूरच्या तहसील कार्यालयाकडून विटाभट्टीचे परवाने दिल्या जात आहेत असे सांगितले जाते आहे.सत्य काय आहे हे महशुल विभागालाच माहिती.
       मात्र,२४ हजार ८०० रुपयाचा दंड आकारुण,विटाभट्ट्यांना परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे.या २४ हजार ८०० रुपयात,किती विटा तयार करायच्या व किती दिवसात विटा तयार करायच्या याचे ताळमेळ महशुल विभागात अजिबात दिसत नाही.
      नितीन शेंडे,"याला,विटा भट्टीचा परवाना आहे काय?असे दिनांक १४ में रोजी,विटाभट्टीच्या स्थळावर विचारले असता,त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी अॅड.भावीक चिवंडे यांच्या उपस्थितीत,विटा भट्टीचा परवाना नसल्याचे सांगितले व २४ हजार ८०० रुपयांची दंडात्मक पावती असल्याचे सांगितले.याच बरोबर विटाभट्टी ज्या ठिकाणावर सुरू आहे,"त्या,जागेचा ७/१२ नसल्याचे सुध्दा स्पष्ट केले.
        या विटाभट्टीच्या संबंधात,मौजा जांभुळघाट येथील तलाठी येरमे यांना भ्रमणध्वनी द्वारे विचारले असता,भुमापन क्रमांक २३०/१,मध्ये नितीन शेंडे यांच्या विटाभट्टीचे काम सुरू असल्याचे सांगितले व हा भुमापन क्रमांक मोठ्या झाडाच्या जंगलाचा असल्याचे स्पष्ट केले.
        नितीन शेंडे हा,जांभुळघाट तलाठी साझा क्रमांक १५ अंतर्गत,मौजा पारडपार येथील भु.क्र.७८ चा सातबारा उतारा परवानगी फाईला जोडून,विटाभट्टीचे काम करीत असल्याचे गोपनीय माहिती द्वारे कळले आहे.
      तहसील कार्यालय चिमूर येथील सबंधीत विभागाकडे नितीन शेंडे यांच्या विटाभट्टीच्या परवानगी बाबत विचारले असता,माहिती देण्याऐवजी तक्रार करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
     यावरून असे लक्षात येते,"की,नितीन शेंडे यांच्या विटाभट्टीच्या बाबत बरेच खोल पाणी मुरले आहे.या खोल पाण्यात किती जनांनी डूबकी मारली आहे,याची चौकशी तहसीलदार चिमूर यांनी वेळ न दवडता करणे आवश्यक झाले आहे.
    अप्पर तहसीलदार भिसी यांच्याकडे ३ दिवसांपूर्वी नितीन शेंडे यांच्या विटाभट्टीच्या बाबत तक्रार दाखल केली.परंतू त्यांनी तक्रारीला महत्वहीन समजलेत.मात्र,आता तक्रार दाखल करा,वेळीच चौकशी लावतो असे म्हणणारे अप्पर तहसीलदार,तक्रार दाखल केल्यानंतर,चौकशीला थोडा विलंब होईल असे सांगतात!
     यामुळे महशुल विभागाच्या अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवायचा तरी कशा ? हा प्रश्न गंभीरता निर्माण करतो आहे.
          नितीन शेंडे यांच्या विटाभट्टीच्या संबंधात चिमूर तहसीलदार यांच्या कडे काल परत तक्रार दाखल करण्यात आली आहे.चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी वेळेत चौकशी करु व योग्य तेच कारवाई करु,असे तक्रार कर्त्यांना चर्चेअंती सांगितले आहे.
      बघूया तहसीलदार संजय नागटिळक काय करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!