तालुक्यात होत असलेली शेकडो ट्रॅक्टर रेती वाहतूक बंद करा .

पोंभुर्णा तालुक्यात होत असलेली शेकडो ट्रॅक्टर रेती वाहतूक बंद करा अन्यथा त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल.
          विजय ढोंगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोंभुर्णा.

पोंभुर्णा (प्रतिनिधी)

पोंभुर्णा तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. अवैध रेती उपसा मुळे पर्यावरणाला हानी झाली आहे यामुळे सदर रेती तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय ढोंगे यांनी तहसीलदार पोंभुर्णा यांना निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदन त्यांनी वाट्सऐप द्वारे दीले आहे.

             संपुर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.आपली सरकारी यंत्रणा त्या लढ्यात मोलाचे योगदान देत आहे परंतु पोंभुर्णा तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीला उधाण आले आहे .यात काही राजकीय पुढारी वाळू ने आपले हात ओले करुन घेत आहेत.या तालुक्यात रेती तस्कर गब्बर होत आहेत तर बैलबंडी धारकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात गरज असुन.या वाळू चोरांवर शासकीय मालमत्ता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा  अशी मागणी त्यांनी केली आहे

        या वाळू चोरांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या सर्व ट्रॅक्टर चा बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा ही निवेदनातून दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!