आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून मदतीचा ओघ सुरूच

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून मदतीचा ओघ सुरूच
पोलिसासह सलून व्यावसायिकांनाही वाटल्या सुरक्षा किट


मूल (अमित राऊत)
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मूल शहरात हेअर कटींग सलुनमध्‍ये प्‍लास्‍टीक मास्‍क, डेटॉल लिक्‍वीड बॉटल, कापडी मास्‍क चे वितरण भाजपा पदाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आले.
आणि मूल पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी व आरोग्य सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.
मुल शहरातील हेअर कटींग सलुन व्‍यावसायिकांनी व्‍यवसाय करताना खबरदारीचा उपाय म्‍हणून आ. मुनगंटीवार यांनी सदर व्‍यावसायिकांना प्‍लास्‍टीक मास्‍क, डेटॉल लिक्‍वीड बॉटल, कापडी मास्‍क भेट म्‍हणून पाठविले आहेत. त्‍या माध्‍यमातुन व्‍यवसाय करताना त्‍यांना सुरक्षा उपलब्‍ध व्‍हावी यादृष्‍टीने आ. मुनगंटीवार यांनी हा पुढाकार घेतला आहे.
तसेच कोरोना युद्धात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपला जीव धोक्यात घालून पोलीस जनसेवेत तैनात आहेत. न दिसणा-या कोविड १९ या शत्रूशी हा लढा आहे. नागरिकांचे आरोग्य राखताना व कर्तव्य बजावताना पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुर तर्फे मूल पोलीस स्टेशन येथे आयोजित आरोग्य तपासणी व आरोग्य सुरक्षा किट वितरण उपक्रम घेण्यात आला.


हे साहित्‍य वितरीत करताना भाजपा पदाधिकार्‍यांनी सोशल डिस्‍टंसींग काटेकोरपणे पाळले. यावेळी मुल येथील भाजपाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि सलून व्यवसायिक यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!