चिमूर शहरामध्ये खुलेआम जिल्हाधिकारी यांनी केलेल्या घोषणेचे सर्रास होत आहे उल्लंघन



१० रुपयांचा मीठ पॉकेट १५ रुपयाला विक्री सुरू

रतन टाटा यांनी कोरोना आपत्तीवर दिलेल्या पैशांचा परत भरणा तर नाही ?

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.२२ मार्च २०२० पासून कोरोना कोविड - १९ या संसर्गजन्य रोगाची संपूर्ण भारतात साथ सुरु असून संचारबंदी कलम १४४ सर्वत्र लागू करण्यात आली आहे. परंतु या बाबी लक्षात न घेता दररोज चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार हे वेगवेगळया हालचालींवर आपले मत जाहिरपणे जनतेच्या हितासाठी मांडण्याची कार्य करीत आहेत. व जिल्हाधिकारी यांनी १५ मे २०२० ला मिठाच्या तुटवड्याची अफवा सर्वत्र पसरविली जात असून अफवा पसरविणाऱ्यावर कारवाही करण्याचे आदेश दिले असतांना या आदेशाला सर्रासपणे चिमूर तालुक्यातील ठोक व चिल्लर किराणा दुकानदार फेटाळून लावण्याचे काम करीत आहे.
सुप्रसिद्ध असलेले भारतातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांनी १५०० कोटी रुपये कोरोना कोविड - १९ या आपत्तीवर मदत दिली असून याचा परत भरणा अत्यावश्यक असलेल्या मीठावर जास्त दर आकारून घेत तर नसेल असा ? उपस्थित झालेला आहे. १ कि.ग्रॅ.मिठ पॉकेटवर किमतीपेक्षा ५ रुपये जास्त दराने बाजारात विक्री केली जात आहे.
हा १० रुपये विक्री असलेला मीठ पॉकेट १५ रुपयाला सर्रासपणे विकल्या जात आहे.व ग्राहकाने १५ रुपये कसे काय घेत आहात असे दुकानदाराला विचारले असता ठोक विक्रेत्यांकडूनच आम्हा चिल्लर दुकानदारांना जास्त दराने मीठ विकत घ्यावे लागत आहे.म्हणून आजच आम्ही चिल्लर विक्रेते तुम्हा ग्राहकांकडून १० रुपयाने विक्री होत असलेल्या मीठ पॉकेट ची किंमत १५ का घेतली असती ? अशी शब्दरचना मांडत आहे. यामुळे संपूर्ण चिमूर तालुक्यातील गृहिणी मोठ्या प्रमाणात ठोक व चिल्लर किराणा दुकानात गर्दी करून मिठाच्या बॅग ची खरेदी करताना दिसत आहे.यामुळे मिठाचा तुटवडा होऊ शकतो व सर्रासपणे जीवनावश्यक वस्तूंवर अशी नियमितपणे वाढ होत असल्याने  वाद - विवाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून संबंधीत ठोक व चिल्लर किराणा दुकानदारांवर योग्य त्या प्रकारची कारवाही करण्यात यावी अशी मागणी सध्या जनतेत जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!