तेंदूपत्ता चे कामे सुरू करा

तेंदूपत्ता चे कामे सुरू करा.
वनविभागाला दिले निवेदन..
पं.स. सदस्य भावना बावनकर


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
कोरोना विषाणूच्या संसर्गाची झड जिल्हालाही बसली असून केंद्र आणि राज्य शासनाने या आजाराच्या संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोन महिन्यापासून परिसरातील नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे ग्रामीण जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना रोजगार हमीची कामे बंद असल्याने व मिरची सातरे बंद असल्याने कोरोणामुळे रोजगार गेला असल्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याने त्यांच्याकडे कुटुंबाच्या पालनपोषण करण्याचा प्रश्‍न निर्माण झालं आहे परिसरातील बहुतांश विभाग हा जंगल व्याप्त असल्याने त्याठिकाणी तेंदुपत्ता संकलनातुन नागरिकांच्या हाताला काम मिडेल व त्यांची आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल उन्हाळ्यात सर्वात मोठा रोजगार असलेला तेंदुपत्ता संकलन त्वरित मंजुरी देऊन मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर यांनी शंकरपूर वन विभाग कार्यालय वनपाल यांचा मार्फत वनविभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन देवुन केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!