शेतकर्यांनी बियानाबाबत जागृत असायला पाहिजे
शेतकर्यांनी बियानाबाबत जागृत असायला पाहिजे
जितेंद्र पेंदाम (ता.प्रतीनिधी सिंदेवाही ग्रा.)
यावर्षिचा काळ पाहीजे त्या प्रमानात अनुकूल नाही. केव्हा काय होइल सांगता येत नाही.
कोरोना ने तर धुमाकुळच घातलेला आहे.
अशातच आता शेतक-यांच्या शेतीची कामे येनार आहेत. पावसाळा तोंडावर आलेला आहे.
एक पाऊस पडताच शेतकर्यांना शेतीची कामे करावी लागतात.
धान बियानांची जुळवा जुळव करावी लागते.बियाने खरेदी करावं लागते.
त्यामुळे शेतकर्यांनी आताच बियाने खरेदी करायला हवं. आता आपल्याकडे वेळ आहे.
बियाने आनल्या नंतर बियाने ची उगवन क्षमता तपासने महत्वाचे आहे. घरी आनलेल्या बियाने घरीच त्याची तपासनी करावी. सरळ सरळ बियाने शेतात टाकू नये.
बियानाचा लहानसा वाफा बनवुन ( कापसाच्या गादीवर) बियाने ची उगवन क्षमता तपासने गरजेचे आहे.
कारन यावर्षी कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने शेतकर्यांकडे दुकानदार वा कंम्पनी जे धान बियाने ने उत्पादन करतात ते पाहीजे त्या प्रमानात लक्ष घालनार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर येनार नाही त्यामुळे आपल्यालाच सतर्क राहने आवश्यक आहे.
कापसावर गादी वाफ्यावर मोजुन बियाने टाकल्यावर जर बियाने उगवलीच नाही तर शेतकर्यांना दुकानदाराकडे तक्रार करायला वा क्लेम करायला वेळ मिळेल.
काहीक दुकानदारांनी तसं आवाहन केलं आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!