दुर्मिळ अल्बिनो साप डुरक्या घोनस(Sand Boa) ला दिले जीवदान
दुर्मिळ अल्बिनो साप डुरक्या घोनस(Sand Boa) ला दिले जीवदान
ब्रम्हपुरी वनविभागात पहिल्यांदा च नोंद
तळोधी बा. (यश कायरकर)
सावरगांव येथील वन्यजीव प्रेमी तथा सर्पमित्र यशवंत कायरकर यांनी सावरगांव येथील गेडाम यांचे घरगुती विहिरीत पडलेल्या दुर्मिळ रंग असलेल्या डुरक्या घोनस (Sand Boa) या सापाला विहीरीतुन काढुन तळोधी(बा.) वन विभागात त्याची नोंद करन्यात आली .
या दुर्मिळ सोनेरी पिवळसर रंगाच्या सापाची लांबी 1फुट 2 इंच एवढी होती . हा बिनविषारी साप असुन शरिरातील मेलेनीन घटकाचे प्रमाण कमी अधिक झाल्यास प्राण्यांच्या शरीरावर त्वचेचा रंग काळा किंवा पांढरा असा बदल दिसून येतो. बहुतांश लोकांना सापांबध्दल पुरेशी माहिती नसल्याने या सापाला विषारी घोणस समजून मारन्यात येते असे कायरकर यांनी सांगितले. यापूर्वी सुध्दा असा कवळ्या सापाचा अल्बिनो श्री पवार सर यांनी याच परिसरात पकडलेला होता. हा डुरक्या घोनस ची ही ब्रम्हपुरी वनविभागातील पहिलीच नोंद आहे. आणि जिल्ह्यातील सुध्दा पहिलीच नोंद असावी असे त्यांनी सांगितले.
व नंतर सुरक्षित ठिकानी या दुर्मिळ सापाला सावरगांव चे वनरक्षक श्री पेंदाम व आलेवाही वनरक्षक श्री गायकवाड यांच्या उपस्थितीत सोडन्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!