मूल तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण
मूल तालुक्यातील मोठी ब्रेकिंग न्यूज
मूल तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह सापडला
मूल (कुमुदिनी भोयर)
मूल तालुक्यातील चिरोली गावात एका 22 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्ति हा पुणे येथून 17 मे रोजी चिरोली येथे परत आला. या युवकाला संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले. काल रात्रौला स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालात सदर वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिरोली गावाला पूर्णपने सील केल आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात काल पर्यन्त 3 रुग्णाची नोंद असताना काल रात्री 9 नवीन कोरोना रुग्ण असल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात या 22 वर्षीय चिरोली युवकाचा सामावेश आहे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बारा झाली आहे.
मूल तालुक्यात आतापर्यंत कोरोणाची लागण झाली नव्हती, मात्र आता एक केस पुढे आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!