मजूर मजुरीच्या प्रतीक्षेत.
व्हिडींगच्या कामाला गेलेल्या मूल तालूक्यातील दहेगांव येथील आदिवासी मजूर मजूरीच्या प्रतिक्षेत.
मूल (प्रतिनिधि)
मूल तालुक्यातील मौजा दहेगांव येथील वण कक्ष क्र.५१७ मध्ये २ महिण्यापूर्वी व्हिडींगचे काम करण्यात आले होते. त्यामध्ये गावातील ६ मजूर कामावर गेले होते.सदर कामाची मजुरी अजूनही मजुरांना मिळालेली नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
स्थानीक वनक्षेत्रात वनरक्षकांच्या देखरेखेखाली संबधीत काम करण्यात आले. या कामावर दहेगाव येथील दिलीप रघूनाथ गेडाम,वासूदेव तूळशीराम कुळमेथे,प्रशांत प्रभाकर कोडापे,नितेश शामराव आळे,राजेश्वर गणपत आलाम,चंद्रू गोविंदा सिडाम गेलेे होते. या मजुरांची मजुरी प्रति हाजरी रुपये ३६०/- प्रमाणे ६४८०/- रूपये वन विभागाकडे प्रलंबित आहे.संबंधित कामावरील मजुरीअजूनही मजूरांना मिळालेली नाही.याबाबत वन अधिकारी वन विभाग मुल यांना आपल्या मजुरी संदर्भात मजुरांनी आपबिती कथन केली. परंतु वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
मजुरी संबंधात मजुरांनी अधीकार्यांकडे विचारणा केली असता वरिष्ठ अधिकार-यांनी मजूरी रोखून ठेवण्यास सांगितले आहे. असे मजुरांचे म्हणणे आहे.
आता दाद मागायचे तर कुणाकडे अ साप्रश्नमजूरासमोरपडलाआहे.एकीकडे देशामध्ये कोरोनासारख्या संसर्गाशी देश लढत असतांना ग्रामीण भागातील आर्थीक स्थिती बिगडली असताना मजूरी रोखून एक प्रकारे मजूरावर अन्याय करण्यात येत आहे की काय?
असा सवाल मजूर उपस्थित करीत आहेत.
"संबंधित मजुरीसंदर्भात मौजा दहेगाव येथील वनरक्षक श्री. श्याम गेडाम यांच्याशी संपर्क केला असता मजुरांची मजुरी अदा करणे हे वरिष्ठांकडे असल्यामुळे त्या संदर्भात योग्य तो निर्णय वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीच घेतील असे सांगितले."पब्लिक पंचनामा चे व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!