सुरक्षीत अंतराचा असा ही आदर्श

सुरक्षीत अंतराचा असा ही आदर्श




जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही ता.प्रतीनिधी ग्रा.)
कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने सर्व जगाला व्यापलं. अनेकांना प्राणही गमवावं लागलं. तरी कोरोना विषानुचा प्रादुर्भाव कमी व्हायचं नाव घेत नाही.
सरकार नं ,प्रशासन, आरोग्य विभाग ,पोलीस कर्मचारी व इतरही कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत.
आता प्रत्येकाला आपापली जबाबदारी ओळखता आली पाहीजे. जबाबदारी स्विकारली पाहीजे. आपनच आपला रक्षक बनायला पाहीजे.
यासाठी शासनाने ठरवुन दिलेले नियम पाळलं पाहीजे. जे अत्यंत आवश्यक आहे. आपनच आपली काळजी घेतली पाहीजे. सुरक्षीत अंतर ठेवुनच व्यवहार होनं गरजेचं आहे.
कित्येक दुकानदारांनी तसं ग्राहकांना आग्रह करतात.
कोरोना ची जागृता ग्रामिण भागात पोहोचेली पाहायला मिळत आहे.
ग्रामिण भागातील दुकानदार असाच एक आदर्श घालुन दिला.
आपल्या दुकानाच्या समोर एक रस्सी बांधली ,त्या रस्सीच्या समोर डब्बा काढला.एका बांबुच्या काठीला प्लास्टीकचा डब्बा खिळ्याच्या साहाय्याने ठोकला.
ग्राहकांनी दुकाना त गेल्या बरोबर आखुन दिलेल्या डब्यात उभ राहायचं. दुकानदार तुम्हाला विचारतो .काय पाहीजे. नंतर आपल्या सामानाची चिठी दाखवायची . नंतर आपल्या समोर दुकानदार काठीमध्ये लावलेला डब्बा ग्राहकाच्या समोर ठेवतो. लागलेल्या सामानाची चिठी त्या डब्यात टाकायची.
दुकानदार सामान बांधल्यानंतर डब्यात टाकतो. मग तो डब्बा ग्राहका समोर ठेवतो. ग्राहक डब्यातुन सामान काढतो. त्यात सामान खरेदी केलेले पैसे टाकतो.
यामुळे एकमेकाचा संपर्क एकमेकाला येत नाही. ग्राहक आणि दुकानदार दोन्ही सुरक्षीत राहतात .
असे प्रयोग ग्रामिण भागात पाहायला मिळत असल्याने ग्रामिण भाग आदर्श ठरू पाहत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!