चिमुर तालूक्यात लॉकडाउन च्या काळात तस्कराची बल्ले - बल्ले



चिमूर - तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्यात लॉकडाऊन च्या काळात  रेत्ती,मुरमाचे अवैधरित्या जत्खनन,दारु,सागवान वृक्ष सुंगधित व साध्या तंबाखू ची मोठ्या प्रमाणात तस्करीत होत अाहे.या मध्ये तस्कर, कर्मचारी व अधिकाऱ्याची होत आहे बल्ले - बल्ले. जगभरात काविड - १९ विषाणू मुळे संसर्गजन्य या विषानुजन्य आजाराने थैमान घातले आहे.याचाच फायदा रेती तस्कर,कर्मचारी व अधिकारी उचलीत आहे. रेत्ती तस्करी व मुरमाचे अवैध उत्खनन दिवस- रात्रो ला सुरू आहे.पण या कडे पुर्ण पणे महसुल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत अाहे. मागे नेरी येथे रात्रो ला ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले होते पण कारवाही न करता चिरीमिरी करण्यात आली. व तलाठ्यानी मोठी रख्यम घेऊन ते ट्रॅक्टर सोडण्यात आले.अशी चर्चा नेरी परीसरात सर्वत्र सुरु आहे.अाजही चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे.मुरमाचे व गिट्टी चे सुध्दा अवैध उत्खनन मोठ्या प्रमानात सुरू आहे.एका जागेची रॉयल्टी असतांना ४ जागेवर अवैध उत्खनन होत आहे. एका दिवसात लाखो रूपये ठेकेदार कमवीत आहे.जेसीबी व पोकलँड च्या सहाय्याने मुरमाचे उत्खन होत असते.५ वाहनाची परवानगी देत असते पण मुरुम उत्खनन करणारे १५ वाहने लावत असतात. ३ फुटावर खोल उत्खनन करायचे असते पण ते पंदरा ते विस फुट खोल उत्खनन करीत असतात.या गड्यामध्ये पाणी भरल्या नंतर जिवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.बरेचशा ठिकानी अशा खड्यामध्ये जीवहानी झालेली आहे.या घटनेस जवाबदार कोन ?माहीती देऊन सुध्दा महसुलविभाग दुर्लक्ष का करीत असते.जेव्हा अवैध उत्खनन सुरू असते तेव्हा त्या उत्खनन करणाऱ्या व्यक्ती चे तहसील पासुन ते उत्खनन करीत असलेल्या जागे पर्यंत देखरेख असते. तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्याच्या वाहनचालका बरोबार शुध्दा हातमिळवणी होऊन असते. म्हणून तात्काल माहीती अवैध उत्खनन करणाऱ्याना माहीती मिळत असते.रॉयल्टी काढून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे यांना मोलाचे योगदान असते.तलाठी तर त्यांना सलामी मारून त्या जागेवरून निघून जातात.नंतर उत्खनन भेट घेत असतात.
व तसेच चिमर तालूक्यात दारूचा महापुर चालू आहे. प्रत्येक गावात दारू मिळत आहे. दोन दिवसा अगोदर नेरी-चिमुर रोडवर वाहानाचा टायर फुटल्याने विदेशी दारूच्या २० पेट्या पकडण्यात अाल्या पण ३० पेट्या दुसऱ्या वाहानाने दारू तस्कर घेऊन निगुन गेले. अाता पर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. मुख्य अारोपी राजु भाऊ चा शुध्दा शोध चिमुर च्या पोलीस विभागाने लावला नाही किंवा अटकही करण्यात अाली नाही. लॉक डाऊन असताना दारु येते तरी कसी प्रत्येक जिल्हाच्या सिमेवर चेक पोष्ट आहे.सर्व गाड्या चेक होत असतात तर कसे का दारूच्या गाडी येत असते.सामान्य जनते मध्ये प्रश्न पडले आहे.त्याच प्रमाने सुंगधीत व साध्या तंबाखू ची किराणा दुकानात होत अाहे.तस्करी काही प्रशाकीय अधिकारी किराणा दुकाणात चौकसी करायला येत असता व आपले खीसे भरून निगुन जात असतात.अशी चर्चा चिमुर तालूक्यात सुरू आहे.लॉकडाऊन च्या काळात चिमुर तालूक्याती भिसी उप वनक्षेत्रात अवैध सागवान वृक्ष तोड ते सुध्दा चौकसी थंडावली आहे.लाखो रूपयाची अवैध पद्धती सागवानाची वृक्ष तोडण्यात अाले होते.पण अाता पर्यंत कोणत्याही ठेकेदाराला अटक करण्यात आली नाही.याचाच अर्थ असा की वनरक्षक व वनपाल या सागवान वृक्ष तोड मध्ये हात तर नाही ना?हे कर्मचारी ठेकेदारा कडून लाखो रूपयाची देणगी घेत तर नाही ना ?अशी चर्चा चिमुर तालूक्यात जोरात सुरू आहे.या तस्करी मागे प्रत्येक विभागाचे सहकार्य असल्या शिवाय तस्करी होत नसते.या मुळे काही कर्मचारी किंवा पत्रकार अापले कर्तव्य बजवत असते त्यांना मारहान किंवा धमकी दिली जाते.या मध्ये लोक प्रतिनिधीचे कार्यकर्ते रेती तस्करी करीत असल्याचे दिसुन येत अाहे.त्यामुळे शासनाने तात्काल लक्ष देने गरजेचे आहे. काही शासनाचे लोकं लोक प्रतिनिधींच्या ईशाऱ्यावर काम करीत आहे.अशी चिमुर तालुक्यातील सामान्य जनतेत चर्चा नेहमी होत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!