सामाजिक अंतर राखत मूल नगरपरिषदेची आढावा बैठक
मूल (प्रमोद म्हशाखेत्री)
सामाजिक अंतर राखत नुकतीच आपत्ती निवारण यासंबधी आढावा बैठक घेण्यात आली. कोरानाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मूल तालुक्यात कोरानाने पाय रोवले आहे. त्यासाठी नगरपालिकेकडून होत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर आढावा बैठक घेण्यात आली.
त्यात अनेक बाबीवर चर्चा करून संस्थात्मक अलगीकरणात सोयी पुरविणे, शहराबाहेर नाका बसवून बाहेरील लोकांची नावे नोंद करणे, दुकानदारांनी येणार्या ग्राहकांची रजिस्टर मध्ये नोंदणी करणे, मोर्बाइंल नंबर घेणे, सेनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, इत्यादी यपूढील काळात अत्यंत गरजेच्या असल्याने यावर अंमलबजावणी करावी. असे नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी सांगिलते.तसेच पावसाळयापूर्वी आपआपल्या प्रभागातील नालीसफाई चे काम संबंधित कर्मचारी यांच्याशी संपर्क करून त्वरीत करून घेण्यास सांगितले.
प्रा.रत्नमाला भोयर नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, नगरसेवक प्रशांत समर्थ, महेंन्द्र करकाडे, अनिल साखरकर, शाांता मांदाडे, आशा गुप्ता, मिलींद खोब्रागडे, प्रशांत लाडवे, विनोद सिडाम, वनमाला कोडापे, विनोद कामडी, ललिता फुलझेले उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!