अखेर त्या व्यापारी चा मृत्यूदेहच आढळला
चंद्रपूर (प्रतिनिधी)
एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी हैराण असताना चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारात दुकान असलेले एक व्यापारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. आज दोन दिवसांनी नितीन गुनशेट्टीवार (वय 43) या व्यापा-याचा मृतदेह सापडल्याने चंद्रपुरातील व्यापारी वर्ग व्यथित झाला आहे.
गणपती मंदीर जवळ, बालाजी वार्ङ चंद्रपूर येथे राहणारे नितीन गुनशेट्टीवार हे सोमवारी घराबाहेर गेले मात्र, ते घरी परत आले नाहीत.
सोमवारपासून बेपत्ता असून, त्यांची दुचाकी चौकात बेवारस सापडल्याने निकटवर्तीयांनी चिंता अधिक बळावली होती.
ते होलसेल व्यापारी असून, त्यांचे मार्केटमध्ये दुकान आहे. सध्या लॉकडाऊन मुळे व्यवसायाला बराच फटका बसला असून ते आर्थिक तणावग्रस्त असल्याची चर्चा होती.
कालपासून सर्वत्र शोध घेतल्यानंतर शहरालगतच्या हिंगणाळा या ग्रामीण भागातील एका झाडा ला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला असून अधिक तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!