मिठाच्या बाजारात अफवांना उत


मिठाच्या बाजारात अफवांना उत



चंद्रपूर/गडचिरोली (प्रतिनिधी)
छत्तीसगड मध्ये मिठाची काळाबाजारी झाली, आणि तीथून कोरची, आरमोरी भागात मिठाची टंचाई होणार असल्यांची वार्ता पसरली, ही वार्ता, अफवा असल्यांचे गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले तरी, अफवांचा बाजार चंद्रपूर जिल्हयातील सावली भागातही पोहचला असल्यांने, संभाव्य अडचण टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.
आरमोरी येथे एकाच दुकानातून, 200 मीठाच्या बॅग अवघ्या चार तासात  250 रूपयेच्या भावाने हातोहात विकल्याची माहिती दुकानदारांचे आमचे प्रतिनिधीला दिली.
छत्तीसगडमध्ये मिठाचा काळाबाजार सुरू झाल्यांने, तेथे मिठाचे दर वाढले.  या भागाला लागून असलेल्या कोरची, आरमोरीचे मिठाची मागणी वाढली, त्यामुळे मिठाची टंचाई निर्माण होणार असल्यांची चर्चा सुरू झाली आणि मिळेल त्या भावाने लोक मिठ खरेदी करू लागले.  ही  अफवा एवढी पसरली कि, जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी, ‘जिल्हयात मुबलक प्रमाणत मीठ साठा उपलब्ध आहे, मिठाचा तुटवडा असल्याबाबत कुणी अफवा पसरविल्यास, त्यांचेविरूध्द कारवाई करण्यात येईल’ असे जाहीर करीत, नागरीकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत, जास्तीचे पैसे देवून मीठ खरेदी करू नये, अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे, संबधीत तालुक्यातील मीठ संपल्यांचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगीतले.
दुकानदारांनी याबाबत काळजी घेवून ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेवून मीठ विक्री करू नये. याबाबत ग्राहकांना खरी माहिती द्यावी असे आवाहन गडचिरोली प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील पाथरी परिसरातील अनेक महिलांचे माहेर गडचिरोली आहे.  माहेरवरून, मुलींना मीठाची खरेदी करण्याच्या सुचना मिळाल्यांने, काल या भागात मीठ टंचाईची अफवा पसरली आणि मिठाची विक्री अचानक वाढली असल्यांचे दिसून आले..
चंद्रपूर जिल्हयात अशी अफवा पसरू नये यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेणे आवश्यक असल्यांचे मत नागरीक व्यक्त करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!