गोरगरिबांना अन्नधान्यासह ठिकठिकाणी माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप.
जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून चिखली येथे गोरगरिबांना अन्नधान्यासह ठिकठिकाणी माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप.
मुल (प्रकाश चलाख)
कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अशा निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याची मदत व्हावी या भावनेतून आणि अशा कठीण परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या किराणा दुकानांमध्ये नागरिकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे अशा ठिकाणीही सॅनिटयझर, मॉस्कचा उपयोग व्हावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मुल तालुक्यातील चिखली येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी गरजू आणि निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या कीटचे वाटप तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या किराणा दुकानांसह गावात अनेकांना माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप केले.
यावेळी त्यांसमवेत, सरपंच सौ. उर्मिलाताई कडस्कर, चंद्रकांत आष्टणकर, नगरसेवक संतोष कडस्कर, राकेश झोलमवार, प्रमोद कडस्कर यांसह आदि मंडळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!