खांबाडा येथील नुकसान ग्रस्त व घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन समस्या जाणुन घेतल्या - मनोज भाऊ मामीडवार जि.प.सदस्य
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - येथून जवळ असलेल्या खांबाडा गावाला मनोजभाऊ मामीडवार जी.प सदस्य यांनी घरकुल लाभार्थ्यांना व चक्रीवादळ नुकसानग्रस्ताना भेटून समस्या जाणून घेतल्या एकिकडे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही तोच संपूर्ण जनजीवन गारपीट आणि वादळी पावसाने विस्कळित झाले. जनतेची अवस्था ईकडे आड , तिकडे विहीर अशीच झालेली आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी केवळ निवडणूक आली तेव्हाच नाही तर प्रत्येक अडचणीत जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याची जाणीव मनोजभाऊ मामीडवार यांनी नुकतीच खांबाडा या गावाला भेट देऊन करून दिली. कोरोना विषाणूची व्याप्ती दिवसागणिक वाढत असतानाच रविवारी झालेल्या वादळी पावसाने जनतेला दयनीय करून सोडले. कित्येक लोकांचे यात नुकसान झालेले असतानाही कोणताही अधिकारी तपासणी करायला क्षेत्रात फिरकला सुद्धा नाही. मनोजभाऊ मामीडवार यांना सदर बाब माहिती होताच त्यांनी त्वरित संपूर्ण जि.प. क्षेत्राचा आढावा घेण्याचे ठरविले. खांबाडा या गावाला सर्वप्रथम भेट देऊन त्यांनी सर्व योजनांचे सुरू असलेले घरकुल , नुकसानग्रस्त घरे, क्वारण्टाईन असलेले लोक व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, आरोग्य विभागाने आजवर केलेली कामे,ग्राम पंचायत कडून स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, गरीब कल्याण योजना अंतर्गत ग्राहकांना केला जाणारा अन्नपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, शेतकऱ्याला असणाऱ्या खते व बी-बियाणेच्या अडचणी, स्मशानभूमीची झालेली दुरावस्था, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेले हफ्ते, रोहयो कामावरील मजुरांच्या समस्या जाणून घेऊन दुपारी ०१:०० वाजता सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्यासोबत झालेल्या विडिओ कान्फरन्स मीटिंग मध्ये सर्व समस्या निकाली निघेपर्यंत पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच जोपर्यंत झालेल्या नुकसानीचा मोबदला शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू असे सांगून जी.प. क्षेत्रातील उर्वरित गावांचा आढावा घेण्यास प्रस्थान केले.
या आढावा भेटीच्या वेळेस पटले ग्रामसेवक , अमर रामटेके गृहनिर्माण अभियंता, ग्रा.प.सदस्य मंगेशभाऊ धाडसे, रामेश्वरजी कोथळे , आशा सेविका सौ. शीतलताई कोसे , ग्रा.प.सदस्या सौ. शर्मिलाताई बांबोडे, सुनील कडवे, सुधाजी खाटे, शिपाई नत्थुजी गजभे आदी मंडळी उपस्थित होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!