कोरोना काळात मदतीचा हात



मूल (अमित राऊत)
कोरोना काळात मदतीचा हात
आज देशात सगळीकडे कोरोना विषानुने थैमान घातले आहेत. या महामारीच्या भीतीपोटी माणूस माणसापासून दुरावलेला दिसत आहे .सर्वसामान्य लोकांचे काम हिरावून घेतले आहेत ग्रामीण भागात तर ही परिस्थिती अजून वाईट झालेली आहे कामाअभावी गरिबांची उपासमार होत आहे अशाच परिस्थितीत मूल तालुक्यातील चिरोली गाव अडचणीत आलेला आहे पण या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक गावातील देवदूत समोर आलाय. चिरोली हे जन्मगाव असलेले परंतु कामासाठी अनेक वर्षांपासून मुंबईला स्थायिक झालेले श्री दिवाकर गंधेकर मुंबई येथे गंधेकर इलेक्ट्रीकल्स मुंबई प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी आहे यातच कामानिमित्त चिरोली गावात आले असता लॉकडाऊन मुळे मागील 2 महिन्यापासून अडकून बसले होते आणि यातच कोरोनाचा संसर्ग गावात झाला अख्खा गाव अडचणीत सापडला गरिबांचे हाल होत होते हे सर्व घडत असताना श्री. दिवाकर गंधेकर यांनी गावातील अत्यंत गरजू कुटुंबाना मदत करण्याचा विचार आला त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने गावातील जवळपास 100 कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूची त्यांनी मदत केली.श्री दिवाकर गंधेकर यांनी याच काळात नाही तर अनेकप्रसंगी समाजकार्यात सहभागी होतात यापूर्वी त्यांनी गावात महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम केलेले आहे गावातील शाळेत विद्यार्थ्यांकरिता त्यांनी संगणक ई लर्निंग संच भेट दिलेली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत गावातील असंख्य तरुण एकत्र येत गावातील नागरिक, कर्मचारी व्यावसायिक कोनतेही राजकारण, द्वेष दूर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत एक मोठा निधी गोळा केला आणि त्या निधीतून जवळपास पुन्हा 200 हुन अधिक कुटुंबाना जीवणावश्यक वस्तू पुरवल्या जात आहे या कार्यात असंख्य तरुणांनी कोरोनाची भीती दूर ठेवून एकमेकांची काळजी घेत गरजू कुटुंबापर्यंत त्या वस्तू पुरवण्याचे कार्य करीत आहेत अशा कठीण प्रसंगी दिलेला माणुसकीचा हात बाकी लोकांना समाजकार्य करण्याची नक्कीच प्रेरणा देईल या प्रसंगी गावातील सरपंच श्री शालीकजी दहिवले, गावातील अनेक गणमान्य व्यक्ती आणि गावातील तरुणांनी या कार्यात मदत केली समाज माध्यमाद्वारे श्री दिवाकर गंधेकर आणि गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!