अज्ञात वाहनांच्या धडकेत 1ठार तीन जखमी

अज्ञात वाहनांच्या धडकेत 1 ठार तीन जखमी


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या डोमा शिवरा फाट्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत एक महिला ठार तर तीन जखमी झाले असून जखमी मध्ये 5 वर्षांची मुलगी सुद्धा आहे ही घटना रविवारी 4 वाजता घडली
सिरसपूर येथील इंदिरा दडमल 50 असे मृतकाचे नाव असून जखमी मध्ये प्रीती ननावरे 26, कैलास दडमल30, व पाच वर्षांची माही ननावरे आहे
कैलास हे इंदिरा दडमल, प्रीती व माही ननावरे ला घेऊन आपल्या दुचाकीने मेंढेगाव येथून सिरसपूर येथे जाण्यासाठी निघाले होते डोमा फाट्यावरून सिरसपूर येथे वाहन पलटवीत असताना मागून येऊन एक अज्ञात चारचाकी वाहनाने टक्कर मारली त्यात दुचाकी वर असलेले चार ही व्यक्ती खाली पडले त्यात इंदिरा हिच्या डोक्याला गँभिर मार लागल्याने शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत असतानाच वाटेतच मृत्यू झाला तर इतर तीन जणांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास शंकरपूर चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!