संभाजी ब्रिगेड इंदिरा नगर तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
संभाजी ब्रिगेड इंदिरा नगर तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
वासु वाकडे
चंद्रपूर - संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र ने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तादान सप्ताह दिनांक 31 मे अहिल्यामाता जयंती ते 6 जून शिवराज्याभिषेक दिन या सात दिवसाच्या कालावधीत संभाजी ब्रिगेड तर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ''रक्तदान शिबिर'' आयोजित करुन ' अहिल्यामाता होळकर जयंती व शिवराज्याभिषेक दिन'' साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात स्थानिक इंदिरा नगर चंद्रपूर येथे जिल्ह्यातील पहिल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. अरुण धानोरकर सर यांच्या हस्ते झाले. तर यावेळी प्रमुख पाहुणे मा. चामाटे साहेब तसेच संभाजी ब्रिगेड शाखा इंदिरा नगर चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच धानोरकर सरांनी अहिल्यामातेच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच हे रक्तदान शिबिर घेण्यास निनावे ब्लड हॉस्पिटल कडून अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक विनोद थेरे, संजय नैताम, प्रदीप सोनुलकर, केतन पाचपुते, शंखु मुळतकर, राजू लोनगाडगे, शादिक शेख, गोमदेव थेरे, स्वप्नील क्षीरसागर, प्रवीण खामनकर, आशिष भंडारी, गणेश राऊत, नवनीत किन्नाके, वसंत दुरुटकर सह अनेक सहकाऱ्यांनी रक्तदानासह कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन पाचपुते तर प्रस्ताविक शनखु मूळतकर यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!