शेतकऱ्यांना खत आता बांधावरच

शेतकऱ्यांना खत आता बांधावरच
कृषी विभागाचा दिलासादायक  उपक्रम


शंकरपुर (जगदीश पेंदाम)
     
                कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर गावोगावी कृषी केंद्रावर कृषी साहित्य खरेदीकरिता शेतकरी मोठी गर्दी करतील ही बाब लक्षात घेत हीं गर्दी टाळण्यासाठी शासनाने बांधावरच  खत व बी-बियान्याचा   पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
        शासन निर्णय नुसार मंडळ कृषी कार्यालय शंकरपुर व शेतकरी गट यांच्या समन्वयातुन शंकरपुर जवळीक गोठणगाव येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. येथील कृषिधन पुरुष शेतकरी स्वयंसाहाय्यता  गटाला खत व बी-बियाणे यांचा पुरवठा करण्यात आला हा पुरवठा पंचायत समिती सदस्य भावनाताई  बावनकर यांच्या हस्ते करण्यात आला असून, यावेळी कृषी साहाय्यक  पकमोडे, पी. एस. रघुते, संजय कृषी केंद्र चे संचालक संजय बावनकर आदी मान्यवर उपस्थित होते
          शेतकऱ्यांनी बी-बीयाने, खत, औषधि आदी साहित्य खरेदी करतेवेळी परवानाधारक असलेल्या दुकाणातूनच खरेदी करावे तसेच टॅग लॉट नंबर वापराची अंतिम तारीख पाहूनच खरेदी करावी. याशिवाय प्रत्येक दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे, असे आव्हान पंचायत समिती सदस्य भावनाताई  बावनकर यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!