विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा "ड्रीम प्रोजेक्ट" स्वप्नवतच राहणार काय?
मूल (अमित राऊत)
विकास पुरूष सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मूल येथील आठवडी बाजाराच सौंदर्यीकरण स्वप्नातच राहणार काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
सुमारे अकरा करोड रुपये खर्चून येथील आठवडी बाजारात अत्याधुनिक भाजी मार्केट तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर करून घेतला. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असताना या कामाला सुरुवात होऊन वर्ष उलटल्यानंतर दहा टक्केही काम झाले नसल्याने आठवडी बाजाराचे रखडलेले काम पूर्णत्वास जाईल काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आठवडी बाजाराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी खड्डे खोदलेले आहे तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य टाकलेले आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यास आणि भाजी घेणाऱ्या ग्राहकास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तर येथे बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मूलचे कार्यालयामार्फत सुरू आहे. या कार्यालयामार्फत जी विकास कामे सुरू आहेत ती अत्यंत दिरंगाईने आणि संथगतीने सुरू असून त्यात आठवडी बाजारचे कामाचाही समावेश आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!