केळझरचे तलाठी कार्यालय 'देव' भरोसे
चिरोली (प्रतिनिधी) केळझरचे तलाठी कार्यालयात देवराव कोटरंगे यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप शेतकर्यांकरीता डोकेदुखीचा आणि मानसिक त्रासाचा होत असल्यांने, वरिष्ठांनी त्याचा तलाठी कार्यालयातील बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी केल्या जात आहे.
केळझरचे तलाठी मुख्यालयी राहत नाही, त्यामुळे या साज्यात देवराव कोटरंगे म्हणेल तीच पुर्वदिशा अशा पध्दतीने कामे सुरू आहे. या साज्यात तलाठी स्वमताने कामे करण्याऐवजी, देवराव कोटरंगे यांचे मतानेच तलाठी साजा सांभाळीत असल्यांचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
मागील 20 ते 25 वर्षापासून, देवराव कोटरंगे हे या साज्यात कोणत्याही अधिकाराशिवाय हस्तक्षेप करतात, ते कोणत्याही शासकीय पदावर नाहीत किंवा कोतवालही नाही. मात्र तलाठी साजाचे पूर्ण कामे त्यांचे मार्फतच होत असल्यांचा आरोप आहे. देवराव कोटरंगे हे स्थानिक आहेत, त्यामुळे त्यांचे गावातील आपसी वादाचा बदला ते तलाठी कार्यालयातील त्यांच्या हस्तक्षेपातून घेत असल्यांचा गंभीर आरोप आहे.
तलाठी हे मुख्यालयी राहत नसल्यांने, त्यांना स्थानिक परिस्थितीची फारशी कल्पना नसते, याचाच गैरफायदा घेत, देवराव, कुणाला शासकीय भरपायी द्यायची, किती द्यायची, कुणाला नाकारायची याची माहीती ते तलाठयांना देतात व त्यांचे मतानुसारच भरपायी शेतकर्यांना मिळत असल्यांचाही आरोप आहे.
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमानुसार पिक पाहणी तलाठयांनी करायची असते, त्यासाठी विस्तृत प्रक्रिया कायदयात दिली आहे, मात्र केळझर साज्यात अशी कोणतीही प्रक्रिया न करता, देवरावनी सांगीतल्याप्रमाणेच, पीकांची नोंद घेतल्या गेल्याचाही आरोप एका दलित शेतकर्यांनी आमचे प्रतिनिधीजवळ दिलेल्या तक्रारीत केला आहे.
साज्याची सर्व कामे देवराव कोटरंगेच करीत असल्यांने, तलाठीही फारसे लक्ष देत नाही, याचाच गैरफायदा घेत, हा इसम शेतकर्यांकडून प्रत्येक कामाचे अव्वाच्या सव्वा रूपये घेत असल्याच्याही तक्रारी आहेत.
याबाबत आमचे प्रतिनिधीने केळझरचे तलाठी यांचेशी त्यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिली.
देवराव कोटरंगे हे तलाठी कार्यालयात कोणत्याही पदावर नाहीत, ते स्थानिक आहेत, त्यामुळे मागील 24—25 वर्षापासून तलाठी कार्यालयात मदतीचे काम करतात. ते आधी अंशकालीन कर्मचारी होते, परंतू आता ते या पदावर नाहीत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!