आर्गावस जैविक खताचा वापर करा.

आर्गावस जैविक खताचा वापर करा.

कवडू अग्रो प्रोडूसर शेतकरी कंपनी लिमिटेड मुल यांचे शेतकऱ्यांना संदेश.








मुल (प्रकाश चलाख)

विषमुक्त अन्न खाऊ या, शरीराला सुख-समाधान देऊ या, निसर्ग राजा पाणी येऊ दे, निसर्ग राजा हवा येऊ दे, पीक पाणी होऊ दे, बळीचे राज्य येऊ दे, बळीराजा ला सुखी ठेवू दे. ही वेळ सध्या सगळ्यांवर आली आहे. शेतात होत असलेल्या अवाढव्य रासायनिक खतां चा मारा यातूनच विषमुक्त अन्न निर्माण होत असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे टाळण्यासाठी जैविक खताचा शेतात भरपूर वापर करण्यात यावा असे आवाहन कवडू ऍग्रो शेतकरी कंपनी लिमिटेड मुल यांनी केले आ हे.

विषमुक्त अन्नाचे उत्पादन घ्यायचे असेल तर जैविक खताचा वापर करून शेती करणे क्रमप्राप्त ठरणार असून रासायनिक खतांचा वापर टाळून शेतात जैविक खताचा वापर करून विषमुक्त अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर गा वस जैविक खत याचा वापर करावा असे आवाहन कवडू ऍग्रो ग प्रोडूसर शेतकरी कंपनी लिमिटेड मुल चे संचालक श्री कवडुजी ये न प्रेडी वार यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

आर गवस जैविक खतात प्रमुख्याने देशी गाईचे गोवर ोमूत्र ,रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, पीएसबी, ई एम सोलुशन, ट्रायकोडर्मा राक फॉस्फेट इत्यादी प्रमुख घटकांचा समावेश असतो. हे घटक अर्गावस जैविक ख तात असल्याने याचे प्रमुख फायदे भरघोस उत्पन्न मिळते. रोगांची प्रतिकारक शक्ती वाढते. सर्व पोषक तत्व उदाहरणार्थ नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश इत्यादी घटक वनस्पतीला मिळतात. त्याचप्रमाणे वनस्पतीचा विकास झपाट्याने होतो. व वनस्पतीचे पोधे स्वस्थ असतात. हे घटक वापरल्या मुळे याचा उत्पादनावर परिणाम होऊन उत्पन्न, आकार, व वजन इत्यादी प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. आर गावास जैविक खतांमुळे जमीन अधिक उपजाऊ व भुसभुशीत होते.


त्यामुळे शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर टाळून अर्गवास जैविक खताचा वापर करून भरघोस उत्पन्न घ्यावे तसेच जैविक खत बाबत अधिक माहिती हवी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन कव डू आग्रो ग्रुप शेतकरी कंपनी लिमिटेड मुल तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!