चिमूर तालुक्यात रेती माफियांचा मोठ्या प्रमाणात सुडसुडाट
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि.३१ मे २०२० आज संपूर्ण भारतात कोरोना कोविड - १९ या विषाणूची महामारी व कलम १४४ सुरु असतांना बिनधास्त रेती माफिया दिवस रात्र चिमूर येथील उमा नदि पत्रातून तसेच शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या नदी पत्रातून तर कधी जंगलातून रेतीची चोरी करून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते.याची हितंभूत माहिती नगर सेवक , सरपंच , वनविभाग तसेच महसूल विभाग यांना माहिती असतांना सुद्धा हि वाहतूक का थांबत नाही असा ? जनतेला पडला असून यामध्ये प्रामुख्याने पैसे घेऊन तलाठी व वरिष्ठ महसूल अधिकारी शांत बसून आहे.
यामुळे समोर येत्या काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. व आता चंद्रपूर जिल्ह्यात ४६ डिग्री तापमान असून चिमूर तालुक्यात पाण्याची पातळी कमी झाली आहे.२ कि.मी.अंतर गाठून जनता पिण्यासाठी पाणी आणत आहे . अशा प्रकारे जीवाची कडक उन्हात लाई - लाई होत असून कसलीही परवा न करता सुखलेल्या घशाची तहान मिटविण्यासाठी दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.
याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून या रेती माफियांवर व ज्या तलाठी च्या साज्यातून रेतीची चोरी केल्या गेली त्यांच्यावर रितसर शासकिय पदाचा गैरवापर केल्याबद्दल कारवाही करण्यात यावी जेणेकरुन समोर चालून अशाप्रकारे शासकिय महसुलाची चोरी होणार नाही अशी चर्चा लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्था यांच्या कडून वर्तवली जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!