दिव्यांगाशी बांधली तिने लगनगाठ

दिव्यांगाशी बांधली तिने लगनगाठ

प्रेरणादायी विवाहाची मूल तालुक्यात प्रसंशा


(अमित राऊत, मूल)
नवतरूणीने नव्या जीवनाची स्वप्ने रंगविली, रितसर जाती रिवाजाप्रमाणे लग्न जमले, साखरपुडयाचा विधीही पार पडला, परंतू विधात्यांनी अडथळा आणला अन स्वप्नातील राजकुमार अपघातात दिव्यांग झाला. दिव्यांग मुलांसोबत कशी लग्न करणार? हा घरच्या साऱ्यांचाच प्रश्नाला उत्तर तीने दिले, आणि थेट होणाऱ्या पतीराजाच्या घरची वाट धरली. लग्न वगैरे सोपस्कार करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आयुष्य ज्यांचेसोबत घालवायचे आहे, त्या जीवनसाथीला आज माझी गरज आहे, हे सांगत या युवतीने समाजासमोर एक नवा आदर्श घालवून दिला. गावकऱ्यांनीही या आदर्श लग्नसोहळयांचे साक्षीदार होत, तरूणीच्या त्यागाला आणि हिमंतीला दाद दिली.


हा अनोखा विवाह सोहळा घडला, चिमढा येथील जुमनाके परिवारात. मूल पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम जुमनाके यांचा नातू, चेतन जुमनाके यांचा विवाह नागभीड तालुक्यातील पाजंरेपार येथील भारती गेडाम हिचेसोबत जाती रिवाजाप्रमाणे जुळला. साखरपुडा शालमुंदिचा कार्यक्रमही पार पडला. विवाहाची तारीख काढण्यात आली. मात्र त्याच दरम्यान, दुचाकीवरून जाताना चेतनचा अपघात झाला आणि या अपघातात त्याला आपला पाय गमवावा लागला.

वधू कडील मंडळी दिव्यांग झालेल्याला आपला जावई बनविण्यास तयार नव्हते. मात्र वधूने, लग्नानंतर, माझा नवरा अपघातात अपंग झाला असता तर? असा अनुत्तरीत करणारा प्रश्न उपस्थित करीत, घरी कोणतीही पूर्वसुचना न देता, वर मंडपी चिमढात आली, मुलांचे नातेवाईकांसोबत बोलून, मी चेतनला मनातून पती मानले आहे, माझे चेतन सोबत लग्न लावून द्या असा आग्रह धरला. गावातील पोलिस पाटील व काही मोजके नातेवाईकांनी एकत्र येवून, सोशल डिस्टनिंग ठेवून, दिव्यांग झालेल्या चेतनसोबत कोणताही गाजावाजा न करता लग्न लावून दिले. दिव्यांग असण गुन्हा नाही, त्यांना तर आता सोबतीची खरी गरज आहे, तेच मी केली, असे तीने आमचे प्रतिनिधीशी  बोलतांना अभिमानाने सांगीतली.
शासनाने या दोघांच्या त्यागाची आणि परिस्थितीची जाणीव करून आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!