प्राचार्य चंदनसिंग रोटेले यांच्यावर गुन्हा दाखल



चिमूर (विलास मोहीनकर)
आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर, जि. चंद्रपूर येथील संस्थाध्यक्ष/अधिव्याख्यता चंदनसिंग प्रेमसिंग रोटेले, (ईलासे), वय ६२ वर्षे, सध्या राहणार नागपूर यांनी आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून गैरमार्गाने अपसंपदा जमविल्याचे आरोपाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली. प्राप्त तकारी वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयाकडुन चंदनसिंग प्रेमसिंग रोटेले यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली.

उघड चौकशी दरम्यान चंदनसिंग प्रेमसिंग रोटेले, वय ६२ वर्ष, यांनी त्यांना लोकसेवक म्हणुन मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन गैरमार्गाने त्यांचे शासकीय सेवेच्या म्हणजे सन सप्टेंबर-१९९२ ते नोव्हेंबर -२०१३ या कालावधीमध्ये रु ७४,८७,५५१/- (३१.३८ टक्के) अपसंपदा जमविल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे. चिमुर जि. चंद्रपूर येथे कलम १३(१)(ई) सहकलम १३(२) भ.प्र.कायदा १९८८ अन्वये आज दि. १२/०५/२०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!