पवनपार परीसरात रोजच्या पावसाने धान पिक धोक्यात
पवनपार परीसरात रोजच्या पावसाने धान पिक धोक्यात
जितेंद्र पेंदाम (ता.प्रतीनिधी सिंदेवाही):-
रोज कुठेना कुठे अवकाळी पाऊस पडतच आहे. कधी ढगाळ वातावरन तर कधी गारपीटचा पाऊस. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
पवनपार परीसरात पवनपार, टेकरी ,गुंजेवाही या गावातील शेतकर्यांनी शेतामध्ये डबल फसल धानाची शेती केली.धानाच पिक अंतीम टप्यात आलेले आहेत. यापुर्वी नुकत्याच झालेल्या गारपीटने धानाची नुकसान केलं.एैन कापनीवर आलेला धान पीक गारपीटीने घेवुन गेला. पुर्णता लोंब झळुन गेल्याने दोन ते तीन एकड मध्ये केवळ पंधरा पोते धान पीक हाती आल्याने शेतकर्यांचे शेतीला लागलेला पैसाही निघाला नसल्याने येथील शेतकरी संकटात सापडला आहे.
गारपीटीने नुकसान झाले ते झाले तिथुन वाचलेले धान पीक तरी हाती येइल या आशेवर येथील शेतकरी होता.
मात्र आता रोजच ढगाळ वातावरन आणि एक दिवसा आड कधी कधी तर रोजच पाऊस येत असल्याने कापलेले धान पीक भिजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कधी गारपीट कधी पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
ओले झालेले धान विकायला जड जात असल्याचे शेतकरी चर्चा करीत असतात.
कृषी विभाग फक्त चौकशी करतात. नुकसान भरपाइ देत नसल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!