चिंधी (माल) मध्ये बाहेर राज्यातून आलेले मजूर कोरोंटाईन पूर्ण न करता पळाले
चिंधी (माल) मध्ये बाहेर राज्यातून आलेले मजूर कोरोंटाईन पूर्ण न करता पळाले
203 पेक्षा जास्त लोक गावात परत आले.
परिसरात दहशत, कोरोना समिति व अधिकारी यांचे गावाकडे दुर्लक्ष.
तळोधी बा (यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) या गावातील मजूर मजूरी करीला नेहमीच बाहेर राज्यात सुध्दा जातात. मात्र कोरोना या महामारी नंतर देशात लाँक डाउन करन्यात आले . शासनाने दिलेल्या मुभेनंतर आत्ता हे मजूर बाहेर राज्यातून गावात परतले. मात्र यांनी शासनाच्या आदेशाची अवहेलना करत.आपले कोरोंटाईन पुर्ण न करता गावात, परिसरात रोज भटकतांना दिसून येतात.
हे मजूर उडिसा, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, अशाप्रकारे अनेक राज्यातून परतले आहेत. मात्र आधी काही मजूर परतले त्यांनी आपले कोरोंटाईन पुर्ण केले. आणि काही गावातील शाळेत होते, मात्र नंतर च्या आलेल्या मजूरांनी घराचा रस्ता धरला, व घरातही न राहता गावभर भटकतात, व परिसरातील गावात सुध्दा हे फिरत असल्याने त्यामुळे ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी गावातील कोरोना समिती ,सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, याच्याशी संपर्क साधून बाहेर राज्यातून आलेल्या लोकांना कोरोंटाईन पुर्ण करन्याची सक्ती करावी असे सांगितले. मात्र गावातील कुचकामी समीती याकडे दुर्लक्ष करत आहे. व गांव व परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन. त्यांना घरात बसून राहन्याचे बाध्य करावे. असे गावातील लोकांची मागणी आहे.
विषेश म्हणजे हे मजूर वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करत आले आहेत तर काही लोक गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा या गावातुन ही आलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोनतीही मोठी समस्या निर्माण होन्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आणि जिल्ह्यात परतनार्या प्रवाशांच्या मुळेच जिल्ह्यातील कोरोना पाझीटिव्ह ची परिस्थिती निर्माण झाली आहे. करीता काही नवीन रुग्णांत भर पडन्या पुर्वी परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार व पोलिसांनी लक्ष द्यावे असे ग्रामस्थांचे मागने आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!