मृत्यु नंतरही वेदना इथे संपत नाही

मृत्यु नंतरही वेदना इथे संपत नाही ...
लाखो रुपये खर्च करूनही अंत्यसंस्कारा साठी इथे न्यावे लागते पाणी.


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
इतकेच मला सरणावर जातांना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते... 
जीवनाच्या जाचापासून सुटका करणारा मृत्यू हा एकमेव जिवलग! परंतु मृत्यूनंतरही पाषाणहृदयी प्रशासन व लोभी, भ्रष्टाचारी राजकारणी कडून सोई अभावी निर्जीव कलेवरांची होणारी उपेक्षा आणि छळवणूक थाबत नसेल तर याला दुर्दैव म्हणू नये तर काय? असेच दुर्दैव शंकरपूर च्या वाटयला आले आहे  शंकरपूरातील अनेक विकासची कामे अर्धवट व अपुरे असल्याने शंकरपूरला हाय टेक व माडेल बविण्याचे  स्वप्न हे मृगजळ ठरले आहे. शंकरपूर येथील हाय टेक स्मशान भूमी तयार  करण्याचे काम मागील पाच वर्षापासून सुरु असून अजूनही अपुर्ण आहे. यासाठी जिल्हा निधी अंतर्गत ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले यात शोकसभा मंडप, स्मशान शेड, बगीचा, बसायला खुर्च्या, जळाऊ लाकडाचे शेड, व पाण्याची सोय गेट व चाहु बाजूनी संरक्षण भिंत आदि परिपूर्ण सोयीनी असे हाय टेक स्मशानभूमीचे स्वप्न शंकरपूर वाशिया मागील पाच वर्षा पासून पाहत आहे  मागील पाच वषात २८ लख रुपये खर्च करून दिखाव्यासाठी समोरील गेटचे पुंर्ण व संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण करू रंगरंगोटी करण्यात आली परंतु नियोजनाप्रमाणे आतील शोकसभा मंडप, स्मशान शेड,  आदीचे काम बरेच अपुरे असून बगीचा, बसायला खुर्च्या, जळाऊ लाकडाचे शेड, व पाण्याची सोय आदि कामाला अजूनही सुरुवात नाही त्या मुळे आणखी दिती दिवस वाट पहावी लागेल याचे उत्तर अजूनही निरुतर आहे  शोकसभा मंडपवार फक्त टिनाचे पत्रे पडले आहे परंतु अजूनही फ्लोरिंग व पायऱ्या अपुऱ्या आहे. दोन वर्ष पूर्वी या ठिकाणी महागडी पामची झाडे लावली होती परंतु देखरेखी व पाण्या अभावी सुकली लाखो रुपयाचे बाधाकाम झाले परतू या ठिकाणी कुठलीही पाण्याची सोय करण्यात आली त्या मुले वृक्ष लागवडीवरचा खर्च वाया गेला 
शंकरपूर येथे मुंडा तलाव येथिल जागेवर आधीपासून स्मशानभूमी साठी वापर होत आहे परंतु त्या ठिकाणी कुटलीही सोय नसून त्या स्मशानभूमी कडे जाण्याच्या मार्गणार काही ठिकाणी मुरमासाठी खड्डे खोदल्या तर काही ठिकाणी सामन्या जनतेनी व समाजबाधवाणी धार्मिक स्थळासाठी जागेवर अतिक्रमण केल्याने जाण्या येन्या साठी मार्ग उरला नाही त्यामुळे अंत्यसंस्कारा नेताना आप्तजणांना तारेवरची कसरत करावी लागते.
  मागीलवर्षी सततच्या पावसामुळे मुंडा तलाव येथिल जागेवर अंतविधी करणे शक्य होत नसल्याने येथील जनेतेने नवीन स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करणे सुरु केला परतू त्या ठिकाणी अंत्यसंस्कारा साठी व साफ सफाई पाणी नसल्याने मोठी अडचण निर्माण होता यासठी आप्तजणांना अंत्यसंस्कारासाठी घरून पाणी न्यावे लागते त्यामुळे  आता परत शंकरपूर वंशीय मुंडा तलाव येथिल जागेवर अंत्यसंस्कारासाठी वापर करीत आहे.
जनतेचा पैसा जानेच्या विकास कामाच्या नावर लाखो रुपये मंजूर करून, आपण जातेसाठी काहीतरी करीत असल्याचा आव आणून पाषाणहृदयी प्रशासन व लोभी, भ्रष्टाचारी राजकारणी कडून यथील जनतेची दिशाभूल करीत आहे मृत्यनंतरही अंत्यसंस्कारा साठी होत असलेली वाताहत हि तर  निर्जीव कलेवरांची होणारी उपेक्षाच मन्हावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!