नितेश शेंडे यांच्या विटाभट्ट्या सरकारी जागेतच,४ वर्षांपासून करतो सरकारी जागेवर विटाभट्यांचा व्यवसाय - अखेर आज झाला जागेचा व विटाभट्यांचा चौकशी अंती पंचनामा
भुमापन क्रमांक २३०/१ या सरकारी जागेवर विटाभट्यांचा होता अवैध व्यवसाय
चिमूर : - प्रतिनिधी ( केवलसींग जुनी )
चिमूर : - दि.१९/०५/२०२० नितेश बाळकृष्ण शेंडे हा,"चिमूर,तहसील अंतर्गत महशूल विभाला चकमा देत मागील ४ वर्षांपासून सरकारी जागेवर विटाभट्यांचा अवैधपणे व्यवसाय करीत असल्याचे चौकशी अंती आज पुढे आले आहे. आज प्रत्यक्ष मौका चौकशी करण्यासाठी जांभुळघाट मंडळ अधिकारीआर.एन. पाटील,जांभुळघाट तलाठी जिवन येरमे,मांगलगाव तलाठी बाळकृष्ण नन्नावरे हे मौका स्थळावर म्हणजेच तलाठी साझा क्रमांक १५ अंतर्गत मौजा पारडपार हद्दीतील भुमापन क्रमांक २३०/१ या सरकारी जागेवर आले होते.
विटा तयार करणाऱ्या स्थळाची प्रत्यक्ष नकाशाला व भुमापन क्रमांकाला अनुसरून मोका चौकशी केली. असता,मोठ्या झाडाचे जंगल असे नमूद असलेल्या भुमापन क्रमांक २३०/१ वर मौजा पारडपार येथील रहिवासी नितेश बाळकृष्ण शेंडे हा अवैधपणे कच्च्या मातीच्या विटा मजूरांद्वारे तयार करुन विटांचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावर्षी आतापर्यंत ४ लाख विटांचा व्यवसाय केल्याचे पुढे आले आहे. व विटा तयार करणाऱ्या माती अंतर्गत जागेची परवानगी नसल्याचे तलाठी जिवन येरमे यांनी स्पष्ट केले.
मोका स्थळाचा पंचनामा करताना अवैध विटाभट्टी व्यवसायक नितेश बाळकृष्ण शेंडे हा प्रत्यक्ष हजर नव्हता,मात्र त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ मंगेश बाळकृष्ण शेंडे हा मोका स्थळावर हजर होता.मंगेश बाळकृष्ण शेंडे यांच्या विटा तयार करणाऱ्या पंचनामावर सह्या घेण्यात आल्या.
या पंचनाम्यावर मंडळ अधिकारी आर.एन.पाटील,जांभुळघाट तलाठी जिवन येरमे,मांगलगाव तलाठी बाळकृष्ण नन्नावरे,पत्रकार केवलसींग जूनी व दखल न्युज चे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या सह्य्या आहेत.चौकशी अहवाल अंतर्गत चिमूर तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक हे नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.मात्र,दंडात्मक कारवाई बरोबर फौजदारी कारवाईची मागणी तक्रारकर्त्यानी केली आहे हे विशेष.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!