स्वदेशी अपणाओ साठी तरुणांचा निर्धार.
स्वदेशी अपणाओ साठी तरुणांचा निर्धार.
मुल (प्रकाश चलाख)
भारताचे प्रधानमंत्री,श्री.नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी चा आवाज दिला आहे, त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मूल तालुक्यातील काही होतकरू स्वाभीमानी तरुणांनी येथील खादीच्या दुकानात एकत्र येऊन खादीच्या वस्तू खरेदी केल्या.
देशाचा पैसा देशात रहावा,तसेच गावातला पैसा गावात रहावा,म्हणून आम्ही सर्व युवकांनी,श्री.किशोर कापगते,राकेश ठाकरे,शाम उराडे,शैलेश वनकर,कुमार दूधे,हेमंत शेंडे,जिड्डिवार सर,राजू,व अनेकांनी आज मूल येथे तयार झालेल्या खादीच्या स्वदेशी “बंड्या” खादी ग्रामोद्योग मधून खरेदी केल्या.असे आमच्या प्रतिनिधी जवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या तरुणांनी स्पष्ट केले .
जय स्वदेशी चा नारा बुलंद करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याआवाहनानुसार आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार व्यक्त केला. तरुणांच्या या अभियानाचे नगरात स्वागत व कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!