उमा नदीवरून अवैध रेती वाहतूक सुरूच!
उमा नदीवरून अवैध रेती वाहतूक सुरूच!
रेती तस्करांवर कारवाई करा; अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार दाखल करू.
श्री.किशोर पेंदाम
सामाजिक कार्यकर्ता, दहेगाव.
मूल (प्रतिनिधी)
दहेगांव लगत उमा नदीवरून रात्रोच्या वेळी गावातील व गावाशेजारी ट्रक्टर खुलेआम रेती नेवून विकल्या जात आहे. प्रशासनच्या वतीने काटेकोर प्रयत्न करूनही रेती तस्कर प्रशास नाला तूरी देवून राजरोसपणे रेती उमानदीवरून वाहून नेल्या जात आहे. या रेती तस्करांवर उचित कार्यवाही करावी अशी मागणी दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता किशोर पेंदाम यांनी केली आहे.
परिसरामध्ये अशी चर्चा आहे की रेती तस्कर हे सापळा रचून रेती ची वाहतूककरतात.चिरोली,दहेगाव,नलेश्वर , हळदी अशा ठिकानी आपले माणसे ठेवतात. व अधिका-याची गाडी दिसली की ते फोनद्वारे संपर्क करून माहीती दिली जाते.अशा प्रकारे रेती ची अवैध वाहतूक होवूनही प्रशासन अवैध वाहतूक रोखू शकत नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरात चोरट्या मार्गाने होत असलेली रेती तस्करी याबद्दल प्रशासन हतबल झाले की काय? असाही प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!