वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील ६३ वर्षीय महिला ठार
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दि.१९/०५/२०२० चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्प मधील कोअर व बफर झोन लगत असलेल्या सातारा शेत शिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने सकाळी ०६:३० वा.अचानक पणे केलेल्या हल्ल्यात लिलाबाई चंद्रभान जीवतोडे वय ६३ वर्षे रा. कोलारा हि महिला जागीच ठार झाली असून या पूर्वी याच परिसरातील हि चौथी घटना आहे.गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण मोल मजुरी करूनच करायचे या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला,व सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले होते . त्यामुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे.शवविच्छेदन करण्याकरिता मृत्यदेह चिमूर उपजिल्हा रुगणल्यात दाखल करण्यात आले. व घटनास्थळी तसेच संपूर्ण तपास करतेवेळी शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,नवघरे वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!