लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम


मुल : 19 मे 2020
सचिन वाकडे
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून याला भारतसुद्धा अपवाद राहिलेला नाहि. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन तथा संचारबंदी घोषित करण्यात आली.
गेल्या दिड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्व आस्थापने, बाजारपेठ बंद स्थितीत होते.याच्या परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवत असुन आर्थिक चणचणीत नागरिकांना दिवस काढावे लागत आहे.
मुल शहरातील बाजारपेठ दिड महिने बंद होती. सध्या स्थितीत बाजारपेठा सुरु असल्या तरी दळणवळणाची साधने बंद असल्याने व कोरोनाच्या भितीपोटी तसेच संचारबंदीमुळे नागरिक अति महत्वाचे काम असेल तरच घरा बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्व व्यवसायासोबतच ब्यांकीन्ग क्षेत्रांतहि मोठ्या प्रमाणात दिसून येणारी गर्दी आता ओस पडल्याचे दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!