नियमानुसार चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केलेला नाही याची सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात यावी - प्रकाश मासुरकर
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - कोरोना कोविड - १९ या महामारी प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने परिपत्रक काढून ६७% विकास कामावर खर्चाची कात्री लावून फक्त ३३% च विकास कामावर खर्च करण्याचे आदेश दिले असताना त्यात आरोग्य, स्वच्छता, मदत व पुनर्वसन आणि अन्न व नागरी पुरवठा या कामावर खर्च करायचा आदेश असताना नवतळा येथील ग्रामपंचायत ने विकास कामा अंतर्गत
सिमेंट रस्त्यांच्या काम सुरू केले आहे चौदाव्या वित्त आयोगातील निधी बालकल्याण, पाणी पुरवठा, अपंग, स्वच्छता, आरोग्य असा एकूण ६०% निधी खर्च आणि उर्वरित ४०% निधी इतर कामावर खर्च करण्याचे नियम असताना त्या निधीतून फक्त सिमेंट रस्त्यांवर ६०% खर्च करून नियमाची पायमल्ली झालेली आहे आणि सिमेंट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे.काम सुरू करायच्या आधी संबंधित पंचायत समिती बांधकाम विभागातील इंजिनिअर ला कामावर न बोलविता परस्पर काम सुरू करून कामावर रोलर, पाणी आणि दबाई न करता काम सुरू केलेले आहे तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संबंधित विभागाने ग्रामपंचायत ची चौकशी करून नियमानुसार चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केलेला नाही याची सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे प्रकाश मासुरकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!