चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या प्रभाग क्र. ४ मधल्या नालीचे काम निष्कृठ दर्ज्याचे



कंत्राटदारावर कारवाही करावी - राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष मंगेश बारापत्रे यांची मागणी 

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या प्रभाग क्र.४ मधल्या नाली च्या पाईप लाईन चे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग ( PWD ) चे असून हे काम अंदाजे १०००००००/- अक्षरी एक करोड रुपयाचे असून ते काम संपूर्ण निष्कृठ दर्जाचे असून त्या कामवर कोणत्याही अधिकाऱ्याची देखरेख नाही व त्या प्रभागातील नगर सेवक सुद्धा त्या कामाची पाहणी करीत नाही हि एक आश्चर्याची बाब आहे. वार्डातील नागरिक त्या कामाचा विरोध करत असले तरी अजून जोमाने ठेकेदार नालीच्या पाईप लाईन चे काम करत आहे.
हे काम ठेकेदारांच्या व अधिकाऱ्यांच्या मनमर्जी होत असेल तर त्या कामाचा दर्जा निष्कृठ कि उष्कृठ असेल वरीष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभाग क्र. ४ मधल्या नाली पाईप लाईन च्या कामाची योग्य प्रकारे चौकशी करून संबंधीत ठेकेदारावर कारवाही करावी अशी मागणी राष्ट्वादी कांग्रेस शहर अध्यक्ष मंगेश बारापत्रे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!