लोणकर इंडियन ऑईल पेट्रोल पंम्प चिमूर येथील कामगार ४० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये छत विना ग्राहकांना देतात सेवा
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१७/०५/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात असलेल्या लोणकर इंडियन ऑईल पेट्रोल पंम्प ला ४० वर्षांपासून छप्पर नसून येथील कामगार ४० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा ऊन , वारा , पाऊस अंगावर घेेऊन ग्राहकांना सेवा देण्याचे काम करीत असतात.
हे पेट्रोल पंम्प नियम बाह्य असून अनेकदा अनेक वर्षांपासून ग्राहकांनी पेट्रोल पंम्प मालकाला छप्पर बद्दल विचारले असता १ महिन्यात काम पूर्ण होईल व कंपनीचे काम आहे.छप्पर लावून देने असे म्हणता - म्हणता ४० वर्षे उलटून गेली व १० वर्षा अगोदर हे पेट्रोल पंम्प जळाले सुद्धा होते. व यात मोठी जिवीतहानी होता - होता टळली असून चिमूर शहराच्या मध्यभागी हे पेट्रोल पंम्प आहे. हे पेट्रोल पंम्प राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असून या ठिकाणी पेट्रोल तसेच डिझेल मोठया प्रमाणात विक्री होत असते.
व या ठिकाणी हवा केंद्र नाही , शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही , शासकिय नियमानुसार फायर ची सुविधा नाही , तरी सुद्धा चौकशी करीता आलेले अधिकारी चिरी - मिरी घेऊन वरिष्ठांना नेहमी कोणता अहवाल सादर करीत असेल असा ? चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या डोळ्यासमोर उपस्थित झाला आहे.व या पट्रोल पंम्पाचे मालक हे सत्ताधारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून यामुळे अधिकारी कारवाही तर करीत नसेल असाही ? जनतेसमोर उपस्थित झालेला आहे.हे नियमबाह्य पेट्रोल पंम्प केव्हा शासकीय नियमानुसार परिपूर्ण स्वरूपात दिसेल असाही जनतेला विचार येऊ लागला आहे.याकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देऊन योग्य त्या प्रकारे कारवाही करून परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सध्या चिमूर तालुक्यात जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!