सरकारी जागेवर अवैधपणे मातींच्या विटांचा व्यवसाय करणाऱ्या नितेश शेंडेे यांच्या विटाभट्टीची चौकशी करण्यास विलंब का?



महसुल विभाग कारवाही का करीत नाही


चिमूर -  तालुका प्रतिनिधी ( केवलसिंग जूनी )
       
चिमूर : - चिमूर तहसीलदार व भिसी अप्पर तहसीलदार यांना,सरकारी जागेवर अवैधपणे मातींच्या विटांचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती दिल्यानंतर सुध्दा,तहसीलदार व अप्पर तहसीलदार,हे सरकारी जागेवर अवैधपणे मातींच्या विटाचा सुरु असलेल्या व्यवसायाबाबत गंभीर नसल्याचे दिसते आहे.
     मातीच्या विटाच्या अवैध व्यवसायाकडे तहसीलदार यांनी तातडीने लक्ष न देण्याचे कारण गुलदस्त्यात असले तरी,नितेश शेंडेच्या अवैध विटाभट्टी चौकशीला होणारा विलंब शासनाचा महसूल बुडविणारा ठरु नये,असी चिमूर तालुक्यातील जनमानसात आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
       भुमापण क्रमांक २०३/१ मोठ्या झाडाच्या जंगलाचा(पट्टा) भाग असून,या भुमापण क्रमांकाच्या जागेवर नितेश बाळकृष्ण शेंडे यांची मागील ७ महिण्यापासून विटाभट्टी सतत्याने सुरू आहे.
        नितेश शेंडेे यांच्यावर २४ हजार ५०० रुपयाचा दंड आकारुण वसूल करण्यात आला आहे.मात्र,हा दंड कुठल्या वेळात घेतला व कशा सबंधाने घेतला याबाबत,महशूल विभाग गोपनीयता बाळगून आहे.
        मात्र,तहसीलदार व अप्पर तहसीलदार यांचे,नितेश शेंडेच्या अवैध विटा भट्टीकडे जाणिवपूर्वक होणारे दुर्लक्ष,नितेश शेंडेला दिलासा देणारे ठरु नये,असे तक्रार कर्त्यांचे मत आहे.
       तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर,नितेश शेंडेंच्या अवैध विटाभट्टी व्यवस प्रकरणाच्या चौकशीला विलंब करणे,नितेश शेंडे कडून अतिवेगाने उध्दारीवर विटा घरपोच पोहचविणे,हा सारा प्रकार संसय निर्माण करणारा ठरतो आहे.
      नितेश शेंडेे हा शासन-प्रशासनावर भारी पडू नये... तूर्त एवढेच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!